मुंबई: आमचे सरकार सध्या तयार करत असलेले रस्ते २०० वर्षे टिकतील, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते शुक्रवारी पार्ले कट्टा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितीन गडकरींनी पार्लेकरांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. सरकारने तयार केलेले रस्ते २०० वर्षे टिकले तर कंत्राटदारांचे काय होणार, असा प्रश्नही यावेळी गडकरी यांना विचारण्यात आला. त्यावर गडकरी यांनी हजरजबाबीपणा दाखवत कंत्राटदारांसाठी मुंबई महानगरपालिका आहे, असे उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी बातमी: शिवसेना-भाजपमधील कोंडी फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार


हा कार्यक्रम सुरु असताना मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. तेव्हा कार्यक्रमाच्या निवेदिकेने म्हटले की, हल्ली नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडतो, पावसाचे काही खरे नाही. त्यावर गडकरींनी 'हल्ली पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे', अशी मिष्किल टिप्पणी केली.


आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनेचे स्वप्न इतक्यात पूर्ण होणार नाही - आठवले


दरम्यान, यापूर्वीही नितीन गडकरी यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. मुंबई महानगरपालिकेच्या नावे बँकेत ५८ हजार कोटींच्या ठेवी असूनही मुंबई बुडतेच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मुंबईचा समुद्र मॉरिशस सारखा स्वच्छ व्हायला हवा. पालिकेने बँकेतील पैशांचा उपयोग करून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणले पाहिजे, असा पर्यायही यावेळी गडकरींनी सुचवला होता.