Nitin Gadkari: `बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...`; अधिकाऱ्यांच्या `मालपाणी`वर गडकरींचा प्रहार!
Mumbai News: नेहमीप्रमाणे गडकरींनी प्रशासनातील बाबूशाही (Administrative Officer) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. गडकरींच्या या विधानाला सभागृहात टाळ्या वाजवून दाद मिळाली.
Nitin Gadkari On Corruption: मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची ओळख आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईत (Mumbai News) विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. नितीन गडकरी यांनी आज संमेलनाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. मालपाणी (Corruption) दिल्याशिवाय फाईलच हलत नाही, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय. (nitin gadkari point out admistration corruption says file want move until without giving bribe marathi news)
नेहमीप्रमाणे गडकरींनी प्रशासनातील बाबूशाही (Administrative Officer) आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. गडकरींच्या या विधानाला सभागृहात टाळ्या वाजवून दाद मिळाली. विशेष म्हणजे गडकरी हे बोलत असताना मंचावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. राजकारणातल्या भ्रष्टाचारावर याआधीही नितीन गडकरींनी अनेक वेळा हल्लाबोल केलाय. एवढंच नाही तर माझ्या कामात भ्रष्टाचार (Admistration corruption) आढळला तर राजकारण सोडेन, असं आव्हानही त्यांनी अनेकदा दिलंय.
गडकरी फक्त आरोप करून थांबत नाहीत, तर भ्रष्टाचारमुक्त काम कसं व्हायला पाहिजे, याचा सल्लाही देतात. बाळासाहेब ठाकरे यांनी मला ऑक्रेलिकच्या शीटवर एक वाक्य लिहून दिलं होतं. बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray) ते वाक्य मी नेहमी वाचतो. I like People Who can get the things done... कोणत्याही परिस्थितीत काम झालं पाहीजे, असं गडकरी म्हणतात.
आणखी वाचा - Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
दरम्यान, भ्रष्टाचारमुक्त, जलद आणि उत्तम दर्जाचं काम होऊ शकतं हे गडकरींनी दाखवून दिलंय. त्यांनी भ्रष्टाचारावरुन दिलेल्या कानपिचक्या गांभिर्यानं घेतल्या तर विकासाचा रस्ता आणखी प्रशस्त होईल. भारताला आधुनिक विकासकामाचा मार्ग दाखवण्यासाठी आम्ही तत्पर असू, असंही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत. गडकरींच्या या भाषणाचं कौतूक होताना देखील दिसतंय.