मुंबई : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरें यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त शुक्रवारी वेगाने पसरले होते. या वृत्ताचे शिवसेनेने खंडन केले आहे. आदित्य यांच्या गाडीचे टायर फुटल्याची बातमी दाखवली जात होती. शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाला होता त्यामुळे मोटार बदलून ते नाशिकला गेले .ते व त्यांचे सर्व सहकारी सुखरुप आहेत. दरम्यान आजही आदित्य ठाकरे हे नाशिकमध्येच असणार आहे.


वृत्ताचे खंडन 


शिवसेनेतर्फे दिल्या गेलेल्या मेसेजमध्ये आदित्य ठाकरे सुखरूप असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले. आदित्य यांच्या गाडीचा टायर फुटल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आल्यानंतर अनेक फोन कॉल्स त्यांना येऊ लागले होते. पण आता शिवसेनेतर्फे या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.