मुंबई : विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव विधानसभेत विरोधकांची गळचेपी केली जात असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. 


विरोधक आक्रामक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा होणार होती. मात्र, राज्यपाल अभिभाषणावर बोलू न दिल्याने विरोधक आक्रमक झाले. अनेक विषयांवर अध्यक्ष बोलू देत नसल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. 


सभागृहात गोंधळ


जवानांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनीच विधीमंडळात सोमवारी जोरदार गोंधळ घातला.  शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही साथ दिली. परिचारक यांना परत निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.


याच गोंधळामुळं आधी पंधरा मिनिटं, मग अर्धा तास आणि अखेर दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान, परिचारिक यांचं निलंबन उच्चस्तरीय समितीनं मागे घेतलंय. या समितीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, तेव्हाचे काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांचाही समावेश होता, याकडं सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधलं. तर विधान परिषदेतही धनंजय मुंडेंच्या ऑडियो क्लिपच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला. त्यामुळं परिषदेचं कामकाज दिवसभरासासाठी तहकूब करण्यात आलं.