Eggs Shortage : ना कोंबड्यांवर रोग आलाय, ना खाद्यान्नाची टंचाई आहे... मात्र तरीही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अंड्यांचा दुष्काळ पडलाय... त्यामुळं सकाळच्या ब्रेकफास्टमधून अंडं गायब झालंय... अंडा करी आणि अंडा बिर्याणीवर संक्रांत आलीय.. ही परिस्थिती का आली, ते पाहूया..


संडे हो या मंडे, मिळेना अंडे


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महाराष्ट्रात दरदिवशी 2 कोटी 25 लाख अंड्यांची मागणी असते.

  • मात्र सध्या केवळ सव्वा कोटी अंडी उपलब्ध आहेत.

  • याचाच अर्थ दरदिवशी जवळपास 1 कोटी अंड्यांचा तुटवडा भासतोय...


अंड्यांची गरज भागवण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या शेजारी राज्यांवर अवलंबून राहावं लागतंय. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळं अर्थातच अंड्यांना सोन्याचा भाव आल्याचं दिसून येतंय. 


अंड्यांना सोन्याचा भाव? 


  • मुंबईत 84 रुपये प्रति डझन एवढा अंड्यांचा भाव वाढलाय

  • पुण्यामध्ये 75 रुपये,

  • नाशिकमध्ये 75 रुपये तर

  • संभाजीनगरमध्ये 70 रुपये डझन असा अंड्यांचा दर आहे.


काय आहे अंड्याचा फंडा? 


  • अंडं हे जीवनसत्वं, प्रथिनं आणि खनिजांचा मोठा स्त्रोत आहे

  • अंड्यात शरीराच्या गरजा पूर्ण करणारं अमिनो आम्ल असतं

  • अंड्यात ए, बी, बी 12, डी आणि ई जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते

  • दररोज एक किंवा दोन अंडी खाणं शरीरासाठी चांगलं असतं आहे.


दरम्यान, या अंडे टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलायला सुरूवात केलीय. पांढ-या कोंबड्यांना वाढीव अनुदान देण्याचा तसंच प्रत्येक जिल्ह्याला पिंजरे वाढवून देण्याचा विचार सरकार दरबारी सुरू झालाय... या प्रस्तावाला मंजुरी मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत संडे हो या मंडे, खायला मिळेना अंडे अशीच स्थिती असणाराय.