मुंबई पालिका वैधानिक समित्यांमध्ये कोणत्याही पक्ष सदस्यांची निवड करु नये - मनसे
महानगरपालिकेच्या वैध्यानिक व विशेष समित्यांमध्ये आरक्षित असलेल्या जागेवर इतर कोणत्याही पक्षाच्या सदस्यांची निवड करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका चिटणीस विभागाकडे केलेय.ही मागणी मनसेचे पालिकेतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केली आहे.
मुंबई : महानगरपालिकेच्या वैध्यानिक व विशेष समित्यांमध्ये आरक्षित असलेल्या जागेवर इतर कोणत्याही पक्षाच्या सदस्यांची निवड करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका चिटणीस विभागाकडे केलेय.ही मागणी मनसेचे पालिकेतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केली आहे.
मनसे पक्षासाठी महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये आरक्षित असलेल्या जागेवर अन्य कोणत्याही पक्षाच्या सदस्यांची निवड करण्यात येऊ नये. महापालिकेत नव्या आर्थिक वर्षांसाठी समिती अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीची घोषणा झाली आहे, असे निदर्शनास मनसेने आणून दिलेय.
कोकण विभागीय आयुक्तांनी पक्षांतर केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ९३ झाले आहे. कोकण विभागीय आयुक्त यांनी पक्षांतर केलेल्या मनसेच्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देण्याच्या निर्णयाला पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.याप्रकरणात आतापर्यंत दोन वेळा सुनावणी झाली. ५ एप्रिलला पुढील सुनावणी आहे. याचिका न्यायमूर्तींनी दाखल करून घेतलीय. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट या समितीवर आमच्या कोट्यातून सदस्य नेमण्यात येऊ नये, असे मनसेने म्हटलेय.
अन्यथा उच्च न्यायालयाचा अवमान करण्यात आला, असा दावा मनसेनेकडून करण्यात आलाय. पक्षांतर केलेले ६ नगरसेवक अजूनही मनसेचे असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच कोकण विभागीय आयुक्तांनी अद्याप ६ नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर निर्णय दिलेला नाही. पक्षांतर केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देऊ नये तसंच संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करावे अशी मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.