मुंबई : गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसांसाठी नवीन वर्ष. या नवीन वर्षी सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्व असते. बाजारात सोन्याची किंमत ३२ हजारांच्या घरात पोहचली आहे. तरीही आजच्या दिवशी थोडे फार का होईना सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते.साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोन्याच्या दुकाणांमध्ये एकच गर्दी केली. आशीया खंडातील सर्वात मोठा सोन्याचा मार्केट म्हणून झवेरी मार्केटची ओळख आहे. निवडणूक आयोगाने या क्षेत्राचा समावेश संवेदनशील विभागात केल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची गर्दी झाली नसल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणने आहे. 


आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. मराठी नवीन वर्षांचा पहिला दिवस. यालाच गुढीपाडवा आणि वर्षप्रतिपदा असही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे. यादिवशी नविन संवत्सराचा प्रारंभ होतो याठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढी उभारल्या जातात. प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवास संपवून लंकेचा अधिपती रावणाचा वध करुन विजयी होउन जेव्हा अयोध्येत परतले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. अयोध्या नगरी श्रीरामाच्या या विजयाने आनंदून गेली होती. त्याचाच भाग म्हणून घरोघरी गुढी उभारल्या जातात अशा अनेक अख्यायिका आहेत. यादिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात श्रीखंड पुरी,शेवयांची खीर असा बेत आखला जातो. गुढी पाडव्यानिमित्त आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभर स्वागत यात्रा काढल्या जातात.