मुंबई : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे आता बेस्ट बसचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार हे जवळपास निश्चित आहे. उद्या पुन्हा एकदा कृती समितीची उद्धव ठाकरेंबरोबर बैठक होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त आणि बेस्ट कृती समिती यांची महत्त्वाची बैठक पार पडली. १० ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं होतं. मात्र लेखी आश्वासनाच्या मागणीवर बेस्ट कर्मचारी संघटना ठाम आहेत.


दरम्यान दुस-या बैठकीतही बेस्ट कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही. मात्र जुलैचा पगार 10 तारखेपर्यंत देऊ आणि यापुढेही पगार वेळेवर मिळेल याबाबत निर्णय झाल्याची माहिती बेस्ट महाव्यवस्थापकांनी दुस-या बैठकीनंतर दिलीय. सर्व कर्मचारी आणि अधिका-यांनी संपावर जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं होतं.