मुंबई : २०१४ मध्ये पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत, तिथल्या ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय. हैदराबाद फॉरेन्सिक लॅबनं तसा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातल्या १८५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरच्या ईव्हीएमबाबत आक्षेप घेतला गेला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पराभूत झाले होते.


या निकालाला अभय छाजेड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयानं या ईव्हीएमच्या तपासणीचे आदेश हैदराबाद फॉरेन्सिक लॅबला दिले होते.