मुंबई: भाजपचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्तर भारतीय लोकांना धमकावणे बंद झाले. धमकावणाऱ्या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवली, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत उत्तर भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. मुंबईच्या आजवरच्या विकासात उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या विकासासाठी रक्त आणि घाम गाळला. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यातील लोक आज मुंबईत राहतात. दुधात साखर विरघळते त्याप्रमाणे उत्तर भारतीय मुंबईत समरस झाले. यापूर्वी मुंबईत उत्तर भारतीयांना धमकावले जायचे. मात्र, गेल्या साडेचार वर्षात आमचे सरकार असल्यामुळे हे प्रकार बंद झाले आहेत. आम्ही धमकावणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने फडणवीस यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ही उत्तर भारतीय चालवतात- संजय निरुपम


यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील पूर्वापार चालत आलेल्या नात्याचा दाखला दिला. आज महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात दंगली का बंद झाल्या? दंगली करणाऱ्यांना आम्ही त्यांच्या भाषेत उत्तर दिले, असे योगींनी सांगितले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचेही कौतुक केले. 


म्हणून उत्तर भारतीयांचा गुजरातमधून पळ