मुंबई : महत्वाची बातमी. आता यापुढे सोसायट्यांना (Society) सीसीटीव्ही (CCTV) बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कायद्याच्या कलम144 मधील तरतुदीनुसार शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापना यांना सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. (It is mandatory for private institutions and establishments in Mumbai to install CCTV) या खासगी संस्था, आस्थापनांच्या बाहेरील सर्व परिसर हा सीसीटीव्हीच्या नजरेत आला पाहिजे, त्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसागणिक अनेक घटनांत वाढ होत आहे. गुन्हेगारीला आणि चोरीला आळा घालण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मायानगरी दृष्टीने शासनाने शहरात सह हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. मात्र, मुंबईच्या गल्ली बोळात आणि लहान रस्त्यावर याचा फायदा होत नाही. त्यामुळेच शहरातील सर्व खासगी संस्था, आस्थापनांनी सीसीटीव्ही बसवल्यास अधिक परिसर  सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


सीसीटीव्हीमुळे अनेक प्रकारांना आळा बसू शकेल. तर काही खासगी सोसायट्या, संस्था, आस्थापना अथवा प्रतिष्ठानांमध्ये त्यांच्या खासगी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा कंपाऊंडमधील परिसरस नजरेखाली राहतो. मात्र या प्रतिष्ठानांच्या बाहेरील परिसर निगराणीखाली येत नाही. त्यामुळे हा परिसर कव्हर करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.


पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार शहरातील खासगी प्रतिष्ठानांमध्ये एक लाखांहून अधिक सीसीटीव्ही बसवले जाण्याची शक्यता आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गुणवत्ता आणि रेकॉर्डींग क्षमता खराब नाही याकडेही लक्ष देण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.