मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किलो मीटरचा पल्ला गाठणार आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे. सुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे. एकूण दोन टप्प्यात मिळून १५० बस दाखल होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन आणि 'शिवाई' विद्युद बसचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथे गुरुवारी सोहळा पार पडला. यावेळी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष रणजित सिंह देओल आदी उपस्थित होते.


सेंट्रल एसटी महामंडळ येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या बहुमजली इमारतीचे निर्माण आणि आगार व बसस्थानकाचा पुनर्विकास तसेच विद्याविहार, येथे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थान, विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळा यांचा पूनर्विकास आणि शाळा संकुलाची निर्मिती या कामांचे भूमिपूजन आणि भारतातील प्रथम अंतर-शहर विद्युत बसचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई सेंट्रल इथे अनावरण करण्यात आले.