मुंबई : ओला उबेर चालकानंतर मुंबईतील टॅक्सी चालक आंदोलनाच्या तयारीत आहेत. फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसल्यामुळे टॅक्सी चालकांनी आंदोलनाची तयारी सुरु केलेय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरटीओमध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक बंधनकारक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मात्र, येथील आरटीओमध्ये तशी सुविधा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या ठिकाणी टॅक्सी चालकांना हेलपाटा मारावा लागतो. त्यात वेळ आणि पैसा वाया जातो, असे चालकांचे म्हणणे आहे.दरम्यान, मुंबईत आरटीओमध्ये ते टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाहीत. परिणामी फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी टॅक्सी चालकांना वसई, ऐरोली, पनवेल आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागतात.


15 नोव्हेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास मुंबईतले 50 हजार टॅक्सी चालक जाणार संपावर जातील, असा इशार देण्यात आलाय.फिटनेस सर्टिफिकेट अभावी बंद असलेल्या टॅक्सी मुख्य मंत्र्यांच्या वर्षा निवासस्थाना बाहेर उभ्या करून आंदोलन करणार, असल्याची माहिती टॅक्सी चालकांनी आंदोलनाचा इशारा देताना दिली.