मुंबई : बरोबर १५ दिवसांपूर्वी ३०० मिलीमीटर पावसानं थांबलेल्या मुंबापुरी आज घामाघूम झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंधरा दिवसांत हवामानाचा नूर इतका पालटलाय की ऑगस्टमहिन्यात पावसासाठी लागणारी छत्री आज कडक उन्हासाठी वापरली जातेय. मुंबईत कालचं कमाल तापमान सरासरी तापमानाच्या पाच अंश जास्त होतं.


तर आज सकाळी साडे आठ वाजताच पारा ३० अंशांवर जाऊन पोहचला होता. वातावरणात आर्द्रतेचं प्रमाणही अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं कामावर निघालेला मुंबईकर गेल्या दोन तीन दिवसात घामाघूम होताना दिसतोय.


लिंबूपाणी विक्रेते आणि उसाच्या रसानं गरमीवर उपाय शोधण्याचा नागरिकांनी प्रयत्न केलाय.  सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने पुढील महिन्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.