मुंबई : ओखी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूनंतर गोवा, महाराष्ट्र आणि  गुजरातच्या किनापट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार  दोन दिवसानंतर चक्रीवादळ गुजरात दिशेने सरकेल. गुजरात किनारपट्टी काही भागात वादळासह हलका पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. 


दुसरीकडे ओखी चक्रीवादळात 19 जणांचा मृत्यू झाला असून 63 जण जखमी झालेत. तामिळनाडूच्या राज्य महसूल विभागाने ही माहिती दिलीय.