मुंबई : मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर या शहरातल्या लाखो प्रवाशांना आता दिलासादायक बातमी आहे. उद्यापासून ओला आणि उबेरच्या टॅक्सीज रस्त्यावर पुन्हा धावणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालकांनी कंपन्यांविरोधात सुरू केलेला ऑफलाईन संप अखेर आज मागे घेण्यात आलाय. काल ओला चालकांनी आपला संप मागे घेतला होता. आता आजपासून उबेर चालकांचाही संप मिटला. 


ओला आणि उबेर कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर चालकांनी आपलं ऑफलाईन आंदोलन मागे घेतल्याची घोषणा मनसे वाहतूक सेनेने केली.