ओला, उबेरच्या गाड्यांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
ओला उबेर चालकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं संप पुकारलाय....
मुंबई : ओला उबेर चालकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं संप पुकारलाय....
ओला उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतील, त्यांना मनसेचे कार्यकर्ते धमकावतायत... सायन चुना भट्टीमध्ये मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाड्यांची तोड फोड केली.
मुंबईत ओला, उबेरचे तीस हजार चालक आहेत. मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे.
अनेक मुंबईकर शेअर ओला किंवा उबेरनं ऑफिसला जातात.... हा संप लक्षात घेता मुंबईकरांच्या सोईसाठी अतिरिक्त बसेस, आणि टॅक्सींची सोय करण्यात आलीय. तसंच नव्यानं सुरू झालेल्या हायब्रीड एसी बसचा पर्यायही मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहे.