मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला पूर्वद्रुतगती महामार्गावर जोडणारा कोपरी पूल बंद ठेवण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी हा पुढील पुढील आठ ते नऊ महिने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांची चाचणी घेण्याकरता जुना कोपरी पूल बंद करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व वाहतूक नव्याने सुरू करण्यात आलेल्या दोन्ही पुलांवर वळवण्यात येणार आहे.


सकाळी 7.30 ते 10.30 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळात ही वाहतूक वळवण्यात येणार आहे, सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 4 तास ही चाचणी सुरू असणार आहे. 


मुंबईत वाहतूक कोडींचे केंद्र असलेल्या कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्यात दोन मार्गिका झाल्या. दुसऱ्या टप्प्यात जुन्या कोपरी पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या पुलाची वाहतूक बंद करावी लागणार. याचा परिणाम नव्या पुलावर होणार आहे. 


याचसाठी नव्या पुलाचा वाहतूक क्षमता जाणून घेण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-ठाण्याला जोडणारा जुना कोपरी पूल आज आणि उद्या बंद राहणार आहे...वाहतुकीवर होणा-या परिणामांच्या चाचणीसाठी पूल बंद करण्यात आला आहे. आज आणि उद्या रहदारीच्या वेळेत चाचणी केली जाणार आहे. 


सध्या वाहतूक नव्याने सुरू केलेल्या पूलावरून वळवली जाणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत ही वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच दुस-या टप्प्याच्या कामासाठी पूल पुढील 8 ते 9 महिने बंद राहणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे.