मुंबई : मायानगरी मुंबईत माणसांच्या गर्दीपेक्षाही भयानक सुळसुळाट कोणाचा असेल तर, तो म्हणजे उंदरांचा. लेप्टोस्पायरोसिससारख्या भयानक आजारासोबतच इतरही आजार पसरवणाऱ्या या उंदरांवर नियंत्रण कसे मिळवायचे हा एक मुंबई महापालिकेसमोर पडलेला भलताच मोठा प्रश्न. म्हणूनच मुंबई महापालिकेच्या एका विभागाने थेट ‘मूषक नियंत्रण’ कार्यक्रमच हाती घेतली. आणि तो फत्तेही केला. पालिकेने जानेवारी ते एप्रिल 2017 या कालावधीत तब्बल १ लाख उंदरांचा खात्मा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय स्वच्छता सर्व्हेक्षण अभियानात पहिले येण्यासाठी मुंबई महापालिका जोमाने कामाला लागली आहे. त्यासाठी प्रशासनासोबत प्रभावी योजना आखल्या जात आहे. याचा परिणाम महापालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाच्या कामगिरीत दिसतो आहे. म्हणूनच पालिकेच्या या विभागाने आठ महिन्यात तब्बल १,०९, २१३ पेक्षाही अधिक उंदिर मारले आहेत.


उंदरांमुळे वाढतो लेप्टोस्पायरोसिसचा धोका


प्रामुख्याने उंदीर किंवा इतर कोणत्याही लेप्टोस्पायरोसिसने बाधित प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल आदींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेद्वारे अथका तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रकेश करू शकतात. त्यातून मनुष्यास लेप्टोस्पायरोसिस होग होऊ शकतो. 


मारलेल्या उंदरांची विभागवार आकडेवारी 


विभाग     -     मारलेल्या उंदरांची संख्या



दिघा - ११,४९९
ऐरोली - १४,३५०
घणसोली - १२,०८०
कोपरखैरणे - १६,६०९
तुर्भे - ८,८९५
वाशी - १४, ३९९
नेरूळ - १५,३९९
बेलापूर - १४,२४९
मनपा मुख्यालय - १,२११
एकूण - १,०९, २१३