मुंबई : Omicron Update News : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. (Mumbai Corporation Action plan) धोकादायक देशांमधून येणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे मुंबई महापालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसांत 35 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारी घेतली आहे. 


ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. परदेशातून येणाऱ्यांसाठी पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन महापालिकेने तयार केला आहे. धोकादायक देशांमधून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानुसार त्यांना क्वारंटाईन केले जाईल. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी हा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.


काय आहे अ‍ॅक्शन प्लॅन ?


- विमानतळ सीईओकडून हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार.
- प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी साँफ्टवेअरची निर्मिती. 
- ही यादी आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉररूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार.
-वॉररूममधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार.



- विलगीकरणाचे नियम प्रवासी नीट पाळतात की नाही याची खबरदारी घेतली जाणार. प्रत्येक वाँर्डात 10 अ‍ॅम्बूलन्स तयार ठेवणार.
- महापालिकेची पथक प्रवाशांच्या घरी जावून देखील तपासणी करणार.
प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार. 
- प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर पालिकेची बारीक नजर असणार