मुंबई : ओमायक्रोनचा (Omicron) संसर्ग जगात झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण केवळ मोठ्या शहरात नसून लहान शहरांतही आढळू शकतात. पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ओमायक्रोनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल असे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State cabinet Meeting) सादरीकरण दरम्यान सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीचे दोन डोस सर्वांना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी यावेळी दिले आहेत.


राज्यात कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनचे रुग्ण दररोज वाढत आहेत. कोणताही परदेश प्रवास न करणाऱ्या लोकांमध्ये ही ओमायक्रॉनचा विषाणू आढळल्याने सरकार पुढच्या अ़डचणी वाढल्या आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग कसा झाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


महाराष्ट्रात ग्रामीण भागात तसेच छोट्या शहरामध्ये ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेला ओमायक्रॉन व्हायरस पसरु शकतो असा इशारा दिल्यानंतर आता राज्य सरकार पुढे त्याचा संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी तो किती घातक ठरु शकतो हे समोर आलेलं नाही. पण ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी याला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला आहे.