मुंबई : सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दरवाढीने पाणी आणले आहे. आता तर कांद्याचा दर १२० रुपयांचा घरात पोहोचल्याने व्यापाऱ्यांना चांगले पैसे मिळत आहे. कांद्याला चांगला भाव आल्याने चक्क त्याची चोरी होत असल्याची बाब पुढे आली आहे. २० हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या कांद्याची चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कांदा चोरी आठवडाभरापूर्वी झाली होती. परंतु मंगळवारी दोघांना पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. तब्बल १६८ किलो कांद्याची किंमत २१ हजार १६० रुपये आहे. ही चोरी ५ डिसेंबर ते ६ डिसेंबरच्या मध्यरात्री करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील दोन दुकानांतून कांदे चोरीला गेल्याचे सीसीटीव्ही चित्रित झाले आहे. याबाबत एएनआयने ट्विट केले आहे. तर दुसऱ्या दुकानातून ५६ किलो कांद्याची चोरी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


कांदा चोरी सीसीटीव्हीत चित्रित



सोने, पैसे आणि किंमती ऐवज चोरी झाल्याच्या घटना घडतच असतात. थोडा थोडका नाही तर तब्बल १६८ किलो कांदा चोरी केली गेली. चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत २१ हजार १६० रुपये एवढी होती. अकबर शेख आणि इरफान शेख नावाच्या व्यापाऱ्याचा कांदा चोरीला गेला होता. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही वेगाने तपास चक्र हलवत अमरान शेख आणि साबीर शेख या दोघा चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.