मुंबई: मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही 'ऑपरेशन लोटस'च्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार नॉट रिचेबल झाल्याने अशोक गेहलोत Ashok Gehlot यांचे सरकार पडणार, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या स्थैर्याचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत Sanajay Raut यांनी भाजपला जाहीर आव्हान दिले आहे. सरकार पाडणार.... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच तुमचं ऑपरेशन लोटस सुरु असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरु करून तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नया है वह', आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर


कोणताही मुहूर्त काढा, आमचं सरकार पाच वर्ष चालणार, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, ते जुगार खेळत राहतात. हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे. सरकार पाडणं हेच तुमच्या राजकीय जीवनाचं उद्दिष्ट असेल तर त्याला कोण काय करणार, असा टोलाही राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला. सध्याच्या काळात कोरोनाच्या संकटाविरोधात एकत्र लढणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ. पण आता ही वेळ नक्कीच नाही, असे राऊत यांनी म्हटले. 


शरद पवारांची मुलाखत ही तर मॅचफिक्सिंग- फडणवीस

ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या लांबवण्यात येत असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. मात्र, संजय राऊत यांचा हा दावा भाजप नेत्यांनी फेटाळून लावला होता. कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत अशाप्रकारची वक्तव्ये करत असल्याचे भाजपने म्हटले होते.