अमित कोटेचा, झी मीडिया, मुंबई : सा-या देशाचे लल्क्ष लागलेल्या गुजरातच्या निवडणुकीवर आतापर्यंत दीड हजार कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टेबाजांच्या मते भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे. पण काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढण्याचा अंदाजही सट्टाबाजारात व्यक्त करण्यात येतोय.


दीड हजार कोटींची गुंतवणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभेच्या निवडणूक जस जशी अंतिम टप्प्यात येतीये, तसाच सट्टाबाजारालाही ऊत येऊ लागलाय. सट्टेबाजांनी आतापर्यंत येत्या १८ तारखेला येणाऱ्या निकालांवर तब्बल दीड हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी काही पटींनी वाढण्याची शक्यता आहे. सट्टेबाजांनी भाजपचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं भाकित वर्तवलंय. पण गेल्या २२ वर्षात झाली नाही, इतकी अटीतटीची लढाई गुजरातमध्ये बघायला मिळेल असंही सट्टेबाजांचं मत आहे.


कुणाला किती भाव?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळण्याच्या शक्यतेला सर्वाधिक म्हणजेच पावणे पाच रुपयांचा भाव देण्यात आलाय. १०० ते ११५ जागा मिळण्याच्या शक्यतेला सव्वा दोन रुपयांचा भाव आहे. भाजपला ११५ ते १३० जागा मिळतील हा अंदाज खरा ठरला तर सट्टा लावणाऱ्या साडे चार रुपयांचा भाव मिळणार आहे.


कितीला किती भाव?


१३०-१५० जागा मिळण्याच्या अंदाजावर पैसे लावलेत तर तुम्हाला १ रुपयाचे पाच रुपये मिळतीये. योगायोगानं भाजपला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि सट्टेबाजानं त्यावर पैसे लावले असतील तर सट्टेबाजाची रक्कम तब्बल साडे आठ पटीनं वाढणार आहे.


कॉंग्रेसला कितीचा भाव?


तिकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी लावलेल्या जोरामुळे. काँग्रेसवर पैसे लावणाऱ्यांचंही उखळ पांढरं होणार आहे. काँग्रेसला ५० ते ७० जागा मिळण्याच्या अंदाजाला सट्टेबाजांनी चार रुपयांचा भाव दिलाय. तर ७१-९० जागा मिळण्याच्या अंदाजाला सर्वात कमी म्हणजे ३ रुपयांचा भाव आहे. ९१ म्हणजे काँग्रेसनं बहुमताचा आकडा ओलांडला तर मात्र सट्टेबाजांची चांदी होणार आहे. कारण काँग्रेसच्या बहुमतावर १ रुपया लावणाऱ्या १० रुपये भाव मिळणार आहे.


निवडक १५ शहरांमधल्या लढतींवर वेगळा सट्टा


सट्टेबाजाराच्या बाबतीत ज्याचा भाव कमी तो अंदाज प्रत्यक्षात येण्याची शक्यता सर्वाधिक असते हे इथे नमूद करणं गरजेचं आहे. विेशेष म्हणजे गुजरातमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्यानं निवडक १५ शहरांमधल्या लढतींवर वेगळा सट्टा लावण्यात आलाय. आता कुणाचं उखळं पांढरं होणार..आणि कुणाचा खिसा रिकामा होणार हे १८ तारखेला कळेल.