मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर कालच विधानसभा निवडणुकीची अधिसूचनाही जारी करण्यात आली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यातच आरोप-प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. या राजकीय वातावरणात मुंबईत गुजरातमधून आलेल्या गाडीतून एक कोटींची रोकड पकडण्यात आल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही रक्कम कोणी आणि कशासाठी आणली होती. एवढी मोठी रोकड कशी काय मुंबईत आली असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदिवली पूर्व येथील वेस्टन एक्स्प्रेस हायवे याठिकाणी समतानगर पोलिसांनी रात्रीच्यावेळी नाकबंदीच्यावेळी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. निवडणूकच्यावेळी एवढी रक्कम कोणताला आणि कुठे देण्यासाठी चालले होते यांचा तपास पोलीस आणि आयकर विभाग करत आहेत. ही गाडी गुजरातमधून मुबंई आली होती. बांद्राच्या दिशेनी जाताना पकडली. यामध्ये पाच व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम आल्याने ही रोकड निवडणुकीसाठी नाही ना, अशी चर्चा जोर धरत आहे.