मुंबई : शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून  सुरु झाली आहे.  आतापर्यंत कर्जमाफीसाठी १०  लाख  ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकूण  २६ हजार केंद्रावर अर्ज भरण्यात येत असून  त्यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे.


हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार आहेत. मागच्या आठवड्यापासून जवळपास रोज एक ते सव्वालाख शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे. असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.