नवी मुंबई : म्हाडाप्रमाणे आता नवी मुंबईतील सिडकोकडून सदनिकांची विक्री ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवारपासून सीवूडस् इस्टेट हाऊसिंग योजनेतील शिल्लक सदनिकांसाठी वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकृती व संलग्न प्रक्रिया राबवण्यात सुरुवात करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडकोतर्फे यापूर्वी गृहनिर्माण योजनेतील सदनिकांची विक्री योजना पुस्तिका घेऊन त्याद्वारे अर्ज सादर करण्यात येत होते. मात्र आता सर्व गृहनिर्माण योजना ऑनलाइन पद्धतीच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.


या योजनेचा शुभारंभ सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा उपस्थित होते. 


सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावयचा आहे. नोंदणी, लॉटरी अर्ज, पेमेंट आदी सर्व तपशील ऑनलाइनच करणे आवश्यक आहे.