औरंगाबाद  : तुमच्या मुलांच्या हातात जर मोबाईल असेल, आणि तो ऑनलाईन गेम खेळत असेल, त्यातही आणखी ऑनलाईन पैसे मोजून गेम खेळत असेल तर सावध राहा. हे गेमचं व्यसन त्याला चोरीसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे देखील घेऊन जावू शकतं. कारण औरंगाबाद शहरात असंच एक प्रकरण घडलं आहे, ज्यामुळे आईवडिलांवर मोठ्या पश्चातापाची वेळ आली आहे, त्यातही या घटनेत तो मुलगा परतल्याने, पालकांना दिलासा मिळाला आहे, हे संपूर्ण प्रकरण अतिशय धक्कादायक आहे. तेव्हा नक्की जाणून घ्या झालं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


औरंगाबाद शहरामध्ये एका 16 वर्षाच्या मुलानं ऑनलाइन गेमपायी आई-वडिलांच्या बँक खात्यातून 67 हजार रुपये खर्च केले. यावरून आईवडील रागावले म्हणून राग सहन न होऊन त्या मुलाने चक्क घरच सोडलं. औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिसांनी 3 दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एका कंटेनरमध्ये तो मुलगा असल्याचं आढळलं. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी आईवडिलांकडे सोपवलं.