मुंबई : ग्रामपंचायतींचा निकाल, भारनियमन, राजकारण आणि मुसळधार पाऊस यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घ्या गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता, व्हॅट कमी करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित.


- नांदेड महापालिकेसाठी उद्या मतदान, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं नांदेडकरांना विकासाचं आश्वासन तर आता छुप्या प्रचारावर उमेदवारांचा जोर.


- ग्रामपंचायतींच्या २८६१ पैकी १४५९ ठिकाणी सरपंच निवडून आणत अव्वल ठरल्याचा भाजपचा दावा. बीड जिल्ह्यात मात्र पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागरांच्या पॅनलचा धुव्वा.


- येत्या पाच दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज तर परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान


- गरीबांना हेरून किडनीची तस्करी करणारं मुंबईत आंतरराष्ट्रीय रॅकेट, सूत्रधाराला सहार पोलिसांकडून अटक,  व्हीव्हीआयपींचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं उघड.


- कीटकनाशकं फवारणीनंतरचे मृत्यू रोखण्यासाठी काय करणार? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा राज्य सरकारला सवाल, तर मुख्यमंत्र्यांना यवतमाळमध्ये यायला वेळ नाही का? भाजप खासदार पटोलेंची टीका


- दिवाळीपूर्वीच सोन्याच्या भावात घसरण... आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींमुळे सोन्याचा दर एक हजार रुपयांनी घटला... मात्र दिवाळी दरम्यान सोनं महागण्याची शक्यता


- दादर स्टेशनवर जन्माला आली मुलगी, वन रुपी क्लिनिकच्या डॉक्टरांकडून महिलेची सुखरुप प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप 


- जगाच्या नकाशावर आणखी एक देश अस्तित्वात येण्याची शक्यता, स्पेनमधला कॅटोलिना हा सधन भाग वेगळा होण्याच्या तयारीत, 90 टक्के नागरिकांचा वेगळ्या देशासाठी कौल.


- बॉलीवुड दिवा रेखा यांचा आज वाढदिवस, गेली अनेक दशकं अभिनय आणि सौंदर्यानं गाजवणा-या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव.