मुंबई : भाजप सरकारच्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झालं. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं आज विरोधी पक्षांनी राज्यभरात निर्णयाचा निषेध व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आझाद मैदानात निषेधाचे फलक घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी पाचशे आणि हजाराच्या नोटांना फलकांद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचां श्राद्ध घातलं. 


दुसरीकडे नोटाबंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात मोर्चा काढला. अजित पवारांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. नोटाबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाल्याचा आरोप यावेळी अजित पवार यांनी केला. तर नोटबंदी दिवस भाजप साजरा करत आहे त्यावरही त्यांनी भाजपला सुनावलं. त्यांची कीव करावीसी वाटते, रांगेत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा विसर भाजपला पडल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


तिकडे जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयसमोर पारंपरिक पद्धतीनं नोटाबंदीचं वर्षश्राद्ध घातलं. इकडे नाशिकमध्ये शिवसेनेनंही नोटाबांदीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. गोदेच्या काठी शिवसेनेचे शहरातले ज्येष्ठ नेते अजय बोरास्तेंसह कार्यकर्त्यांनी मुंडन करून आपली नाराजी व्यक्त केली. नोटाबंदीच्या निर्णयानं रद्द झालेल्या ५०० आणि हजाराच्या नोटांचं प्रतीकात्मक श्राद्ध घातलं. या निर्णयामुळे जनतेला झालेल्या त्रासाचा हवाला देऊन पुढच्या वेळी भाजपला पुढच्यावेळी जनता धडा शिकवेल असंही सेनेच्या नेत्यांनी म्हटलंय.