मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मुंबई आणि पुण्यात रुग्ण वाढत आहेत. या ठिकाणी विशेष  लक्ष देण्यात येत आहे. असे असले तरी काही किठाणी शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार २० एप्रिलपासून उद्योग-धंद्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेड झोन, ऑरेंज आणि ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. आता या झोनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात काल ४६६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे ही संख्या आता ४६६६ इतकी झाली आहे. यापैकी ५७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करुनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणालेत


राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती  टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आता राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही, अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही, तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.



कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार १५ पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळतात, यावरुन हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.