मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या दिनानिमित्ताने 'जलदिन संकल्प' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सध्या दुष्काळची दाहकता दिसून येत आहे. ही दुष्काळाची दाहकता लक्षात घेवून राष्ट्रवादीने राज्यात 'जलदिन संकल्प' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस दि. १० जून २०१९ रोजी  २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाचा हा स्थापना दिवस राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन 'जलदिन संकल्प' आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर पाण्याची उद्भवलेली टंचाई आणि महाराष्ट्रात त्यावर विविध पर्याय काय? याबाबत जनजागृती केली जाणार आहे, असे पाटील म्हणालेत.


राज्यभर जिल्हा, तालुका पातळीवरील महापुरुषांच्या पुतळ्यापासून कार्यालयापर्यंत ही 'जलदिंडी' काढली जाणार आहे. त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. याशिवाय 'पाणी' या विषयावर काम करणार्‍या व्यक्तीचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे पाण्याचे महत्व यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.