मुंबई : कोरोना विषाणूचा (Outbreak of corona) उद्रेक पाहायला मिळत आहे. लोकलमधील (Mumbai Local railway crowds) गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation) आता खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादले आहेत. खासगी कार्यालयांमध्ये केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आदेश देण्यात आलेत. याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात मनपाने पाच पथके तैनात केली आहेत. ही पथके खासगी कार्यालयांवर नजर ठेवणार आहे. नियम मोडणा-या कार्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असली तरी पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती मात्र 100 टक्केच राहणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरात कोरोनाचे पुन्हा 180 रुग्ण सापडलेत.. त्यामुळे आतापर्यंत 17 इमारतींसह दोन चाळी-झोपड्या आणि 373 मजले सील करण्यात आल्यात.. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे.


मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून भविष्यात रुग्णांची संख्या 10 हजारांपर्यंत वाढली तरी त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची पालिकेची तयारी आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घाबरू नका, पण काळजी घ्या, कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. दिवसाला कोरोनाच्या 60 हजार चाचण्या केल्या जाणार असून त्याच्या जोडीला दिवसाला 1 लाखांपर्यंत लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़े ठेवले आहे. 


मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील चाचण्याचं प्रमाण वाढवल्यामुळे ही रुग्ण वाढ होत आहे. मुंबईत काल दिवसभरात 46 हजार 869 चाचण्यात झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी घटून 75 दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 33 हजार 961 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.  दरम्यान उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळी वस्तीत 40 कंटन्मेंट झोन्स जाहीर करण्यात आलेत. तर 457 इमारती सील करण्यात आल्यात.


भिवंडीमध्ये कोरोनाचे दिवसभरात 60 रुग्ण वाढलेयत. तर कुणाचाही मृत्यू झाला नाही. आजवर 356 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय.  अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 333 आहे तर आजअखेर शहरात 7हजार 305 रुग्ण आहेत. तर आजवर 6हजार 618जण कोरोनामुक्त झाले आहेत.