मुंबई : मुंबई बाहेरील कोणत्याही खाजगी लसीकरण केंद्रांना मुंबईत येऊन लसीकरण करण्याची परवानगी नसणार आहे. याबाबत मुंबई महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  खाजगी लसीकरण केंद्रांनी औद्योगिक संस्था, गृहसंकुल इथं लसीकरण करण्यापूर्वी सदर संस्थांशी सामंजस्य करार करणे अनिवार्य असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच खाजगी लसीकरण केंद्रांमार्फत वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका यांची उपलब्धता असणे गरजेचे आहे.


महत्वाचं म्हणजे कोणत्याही लसीकरण केंद्राबाहेर राजकीय फलक, पोस्टर, बॅनर, भित्तीपत्रकं लावू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.  राजकीय फायद्यासठी अनुचित जाहिरातबाजी करु नये, अशा शब्दात महापालिका आयुक्तांनी दुसऱ्यांदा राजकीय पक्षांना तंबी दिली आहे. 


मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झाल्यास सदर लसीकरण केंद्रास कारणे दाखवा नोटीस देऊन लसीकरण केंद्रांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.