पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव
प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यासाठी काही ठिकाणी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांवर बंदीची शक्यता आहे.
प्लास्टिक बाटल्यांवर बंदी विचाराधीन
राज्यात ज्या हॉटेल्समध्ये राहण्याची सोय आहे, तिथे पॅकबंद पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं सांगण्यात येत आहे.
दुकानांचे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार
बंदीनंतरही दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळल्यास दुकानांचे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल करण्याचाही प्रस्ताव आहे.
संघटनांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक
याबाबत चर्चेसाठी आज पर्यावरण विभागाने पॅकेज्ड बोटल्स मॅन्युफॅक्चरर्स, दुकान मालक असोसिएशन, हॉटेल मालक संघटनांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक बोलावली आहे.