मुंबई : मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज इथे मनसे वर्सोवा शाखाअध्यक्ष प्रशांत राणे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, असा लिहिलेला केक कापला. प्रशांत राणे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिम्मित हा केक बनवला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तो केक कापण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे कार्यकर्ते घुसखोरांच्या मुद्द्यावर सध्या आक्रमक झाले आहेत त्यामुळेच विविध माध्यमातून ते आपला रोष या घुसखोरांच्या विरोधात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे महामेळाव्यात पाकिस्तानी - बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी देखील स्थानिक पातळीवर आक्रमक होत जोरदार विरोध केला.  मुंबई उपनगर आणि पनवेल परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांग्लादेशी घुसखोऱ्यांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर वर्सोवा आणि पनवेल्याच्या काही भागात असे पाकिस्तानी -बांग्लादेशी पर जा, अशी पोस्टर पाहायला मिळत आहेत.



काही दिवसांपूर्वी वसई-विरामधील अर्नाळ्यात २३ बांग्लादेश नागरिकांना पकडण्यात आले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी ठाण्यातही चार बांग्लादेशी नागरिकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडे बांग्लादेशचा पासपोर्टही सापडला होता. त्यामुळे पाकिस्तानी- बांग्लादेशींबाबत मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. आता पाकिस्तानी- बांग्लादेशींनी परत जा, असा मजकुराचा केक राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थित कापण्यात आला.


दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोर पाकिस्तानी- बांग्लादेशींना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा आयोजित काढला होता. त्याआधी राज ठाकरे यांनी इशाराही दिला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक परिसरात 'बांग्लादेशींनो चालते व्हा’ असा इशारा देणारे पोस्टर लावले आहेत.