मुंबई : पाणीपुरी म्हणजे भारतीयांचं फेव्हरेट चाट. पाणीपुरीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण पाणीपुरीसंदर्भात काही बातम्या अशा कमी आल्या की त्यामुळे पाणीपुरी खाण्याची इच्छाच मरून गेली. अनेकदा तर पाणीपुरीच्या ठेल्यावरील अस्वच्छता पाहून पाणीपुरी कितीही आवडत असली तरी नकोशी वाटते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता अस्वच्छतेमुळे पाणीपुरी खाण्याची इच्छा मारण्याची काही आवश्यकता नाही. कारण यावर मणिपाल तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मार्ग शोधून काढलाय. त्यांची पद्धत जरा हटके आहे. मणिपाल तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इंजीनिअर विद्यार्थ्यांनी पाणीपुरी डिस्पेन्सर मशिन तयार केलंय. त्यामुळे विक्रेत्याला ग्राहकांना पाणीपुरी सर्व्ह करताना स्वच्छतेची काळजी घेता येणार आहे.


या पाणीपुरी डिस्पेन्सरमुळे सुक्या पुरीमध्ये ऑटोमॅटीक पाणी आणि सारण भरलं जाईल. त्यामुळे पाण्यात हात बुडवून ती सर्व्ह करण्याचा किसळवाणा प्रकार टाळता येईल. या डिस्पेन्सरमुळे ग्राहकांना हायजिनिक पाणीपुरीचा आस्वाद घेता येणार आहे. फक्त या डिस्पेन्सरमध्ये सारण भरण्यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता असणार आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीने किती पाणीपुरी खालल्या त्याचा हिशोब देखील ही मशीन ठेवणार आहे.