मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलकरांसाठी एक महत्वाची बातमी... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हे अंतर कापायला हार्बर रेल्वेला सध्या ८० मिनिटं लागतात. पण सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्गामुळं हेच अंतर केवळ ५० मिनिटांत गाठता येणार आहे. हा उन्नत मार्ग नेमका असणार तरी कसा? याची दृश्यं पहिल्यांदाचा 'झी २४ तास'च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या उन्नत जलद मार्गाला २००९-१० सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात पहिल्यांदा मंजुरी मिळाली. त्यानंतर एमआरव्हीसीने याचा प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्यानंतर २०१६ साली त्यालाही मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रकल्पाला स्वतंत्र मंजुरी घेऊन आणखी विलंब करण्यापेक्षा त्याचा एमयूटीपी-३ ए मध्ये समावेश केला आणि गेल्या फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा एकदा अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्नत मार्ग बांधताना केवळ ३० टक्के भाग सध्याच्या हार्बर मार्गावरून जाईल, तर प्रकल्पातील अन्य मार्गासाठी जमीन संपादन करावी लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार आणि सिडकोचे सहकार्य लागणार आहे. प्रकल्पाच्या खर्चाचा वाटा वर्ल्ड बँकेबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारही उचलणार आहे. १२ हजार ३३१ कोटी रूपयांच्या या प्रकल्पाचा खर्च वर्ल्ड बँकेबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारही उचलणार आहे. 


उन्नत मार्गाची वैशिष्ट्यं... 


- या उन्नत मार्गामध्ये ऐकून ११ स्थानके असतील. सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, एलटीटी, चेंबूर, मानखुर्द, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर आणि पनवेल अशी ही एकूण ११ स्थानके असतील


- तसंच, वाशी, खारघर आणि पनवेल ही तीन स्थानके जमिनीवर बांधण्यात येणार आहेत, तर उर्वरित आठ स्थानके उन्नत असतील


- 'मेट्रो'च्या धर्तीवर ही स्थानक असणार आहेत


- सध्याचा हार्बर मार्ग आहे नवीन होणारा उन्नत मार्ग असे दोन वाहतुकीचे पर्याय नवी मुंबई करासाठी होणार आहे


- उन्नत मार्ग वाशी खाडीवरूनही जाणार असल्याने त्यासाठी पूल उभारण्यात येईल. या पुलासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.


- हा मार्ग मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडतानाच मेट्रोलाही जोडण्यात येणार आहे. मानखुर्द येथे प्रस्तावित मेट्रो मार्गाशी, तसेच नेरूळ येथेदेखील मेट्रोशी जोडणी देण्यात येईल.


- १२,३३१ कोटींचा हा ऐकून प्रकल्प आहे नेरुळ इथून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष मार्गिकादेखील बांधण्यात येणार आहे.


- पनवेलसाठी दर तीन मिनिटाला तर विमानतळासाठी दर ८.६ मिनिटाला एक ट्रेन सोडण्याची योजना आहे