मुंबई : Parambir Singh Inquiry : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून (Mumabi Crime Branch)7 तास चौकशी करण्यात आली आहे. तर आज चांदीवाल आयोगासमोर हजर होण्याची शक्यता आहे.(Param Bir Singh Leaves Mumbai Police Crime Branch Office After 7-hours Inquiry)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीसाठी हजर राहिलो, अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितले.


अनेक दिवसांपासून गायब असलेले आणि फरार म्हणून घोषित झालेले परमबीर सिंह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाले. त्यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. कांदिवलीतील व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी खंडणीबाबत तक्रार केली होती. त्यात परमबीर सिंह हे आरोपी आहेत. 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप परमबीर सिंह (Parambir Singh) केला होता. त्यानंतर ते गायब होते. तसेच त्यांच्यावर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गायब असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. फरार घोषित करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह काल मुंबईत दाखल झाले आहेत. 


मागील काही महिन्यांपासून परमबीर सिंह हे तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत होते. फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते.