मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर यांचे नाव आघाडीवर
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत उद्या संपत असून त्यांना मुदत वाढ देण्यास सरकारने नकार दिलाय.
मुंबई : पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत उद्या संपत असून नवे आयुक्त कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाली. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे समजते आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात परमबीर सिंह महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, त्यामुळे त्यांचं नाव आयुक्तपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांचीही नावं चर्चेत आहेत. दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेले सदानंद दाते आता महाराष्ट्रात परतलेत. त्यांच्याकडे सध्या कोणतंही पद नाही. दाते आयुक्तपदाच्या शर्यतीतील डार्क हॉर्स ठरू शकतात. दरम्यान, पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.