अमित जोशी, झी मीडिय़ा, मुंबई : पॅरासेलिंग हा साहसी खेळातील एक प्रकार राज्यामध्ये अवैध असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. विधानपरिषदमध्ये लक्षवेधी प्रश्नाच्या माध्ययमातून मुरुड येथे पॅरासेलिंग करतांना तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण उपस्थित करण्यात आल होतं. अशा साहसी खेळामध्ये झालेल्या मृत्युला जबावदार कोण असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. हे खेळ कोकणाच्या किनाऱ्यावर सर्रास सुरु असतांना याला रोखणार कोण, अशा खेळांवर नियंत्रण कोणाचे, या खेळातील सुरक्षेच्या धोरणाचे काय असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा राज्य शासनाने क्रीडा धोऱण जाहीर केल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांनी दिली. त्यानुसार क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. यामध्ये पॅरासेलिंग या खेळाचा समावेश नसून या पॅरासेलिंग साहसी खेळाला परवानगी नाही, हा साहसी क्रीडा प्रकार अवैध असल्याचं राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


मात्र जर पॅरासेलिंग हा साहसी क्रीडा अवैध असेल तर मग याचे आयोजन कोकण किनाऱ्यावर सर्रास केले जाते त्याचे काय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यावर मात्र पर्यंटन राज्यमंत्री सारवासारव करताना दिसले.