अंसवेदनशीलता! एलफिन्स्टन दुर्घटनेच्या रात्री महापौर बंगल्यावर स्नेहभोजन
मुंबईत एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर दुर्घटना घडली त्याच रात्री महापौर बंगल्यावर पार्टी झाल्याचं समोर आलंय. दोन परदेशी फुटबॉल संघांसाठी महापौर बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई : मुंबईत एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर दुर्घटना घडली त्याच रात्री महापौर बंगल्यावर पार्टी झाल्याचं समोर आलंय. दोन परदेशी फुटबॉल संघांसाठी महापौर बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे या फुटबॉलपटुंच्या स्वागतासाठी महापौरांसह स्वत: युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही हजर असल्याचं उघड झालंय. अंडर सेव्हटीन फुटबॉल स्पर्धेच भारतात आयोजन करण्यात आलंय. त्यापैकी २ परदेशी संघ महापौर बंगल्यावर स्नेहभोजनासाठी आले होते. दुर्घटना घडली त्याच रात्री नऊ वाजेपासून एक तास हा कार्यक्रम सुरू होता. झी २४ तासला मिळालेल्या माहितीनुसार परदेशी फुटबॉल संघातील खेळाडू महापौर बंगल्यावर पॉश लक्झरी बसमधून आले.
परदेशी संघ असल्यामुळे मोठी सुरक्षाही त्यांच्यासोबत होती. दुर्घटनेच्याच दिवशी या स्नेहभोजनाचा घाट घातल्यामुळं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.