मुंबई : मुंबईच्या एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत  २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसाआधीच एका प्रवाशाने याबाबतच्या धोक्याचा इशारा दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष आंधळे यांनी फेसबुक पोस्टवरुन याबाबतची समस्या मांडली होती. मध्य रेल्वेला या पोस्टमध्ये टॅगही करण्यात आले होते. त्यांनी फेसबुक पोस्ट टाकल्याच्या दोन दिवसानंतरच ही दुर्घटना घडली. 


दोन दिवसांपूर्वी संतोष यांनी ज्या पुलावर ही दुर्घटना घडली त्या पुलाचा फोटो टाकला होता. एलफिन्स्टन स्टेशनला जोडणाऱ्या परेल ब्रिजबाबत मध्य रेल्वेने याबाबत काहीतरी करावे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.