पत्री पूलाच्या पाडकामाला गणेशोत्सवापर्यंत स्थगिती
पत्री पूल बंद केल्यापासून कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे.
ठाणे: कल्याणमधील धोकादायक पत्री पुलाच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. २५ सप्टेंबरनंतर म्हणजेच गणेशोत्सवानंतर हा पूल पाडण्यात येणार आहे. दरम्यान तोवर या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होऊ शकते का, याची चाचपणी कऱण्यात येणार आहे.
मुंबई आयआयटी आणि व्हीजेटीआय यांच्यामार्फत या पुलाची पुन्हा चाचणी घेण्यात येईल. एकीकडे मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडून भिवंडी, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा भार कल्याण शहरावर पडला आहे. त्यातच पत्री पूल बंद केल्यापासून कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे.
आज आणि उद्या सुट्टी असल्याने पत्री पूलाजवळ असलेल्या मेट्रो मॉलला खरेदीसाठी येणाऱ्याची संख्या जास्त असते. त्यामुळे या वाहनांची वाहतूक कोंडीमध्ये भर पड़त आहे.