मुंबई : मुंबईत दोन दिवस पडणारा पाऊस मुंबईकरांसाठी गुड न्यूज घेऊन आलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. साधारणपणे १९५ फुटांपेक्षा जास्त पाणी या तलावात साचलंय. दरवर्षी ऑगस्टमध्ये हा तलाव भरुन वाहू लागतो. यंदा मात्र जुलैच्या पहिल्या दोन दिवसांतच तलाव ओसंडून वाहू लागलाय. रात्रभर बरसलेल्या पावासामुळे तलावातल्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केलीय. पुढच्या ४८ तासांत मुंबई शहर, उपनगर आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिलाय.



विदर्भावरील कमी दाबाचं क्षेत्र वायव्येकडे सरकल्याने राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्याच आलीय. ४ जुलैला दुपारनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यताही पुणे वेधशाळेनं वर्तवलीय.