मुंबई : शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शहा यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे येते आहे. गुजरातमधील गांधीनगर इथे दुपारी अडीचच्या सुमारास पवार आणि पटेल खासगी विमानाने अहमदाबादला पोहोचले. तिथे रात्रीच्या सुमारास शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात भेट झाल्याची बातमी गुजराती वृत्तपत्रानं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँटेलिया प्रकरणातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांचं अशा वेगवेगळ्या प्रकरणामुळे सरकार अडचणीत आलं. आता राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चेनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. अशावेळी शिवसेनेकडून कोणती भूमिका घेतली जातेय ते पहावं लागेल.


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड


अमित शाहांसोबत गुप्त भेट झाल्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जिवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहे. मग त्याती कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील उडिसामधले विजू पटनाईक असो बंगालमधले जोती बसु असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिले आहेत. 


'आपल्या राज्यातील प्रमोद महाजन हे त्यांचे अत्यंत जवळचे होते. त्यामुळे संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो.' असे ही आव्हाड म्हणाले.