मुंबई : सोमवारी सायंकाळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सायंकाळी ६.३० वाजता एका पत्रकार परिषदेसाठी ते दाखल होणार होते... त्यापूर्वीच त्यांच्या अचानक पोटात दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल यांना मूतखड्याचा त्रास सतावतोय. परंतु, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. लगेचच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार नाही. परंतु, डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते राहतील. 


हॉस्पीटलमध्ये भरती होण्यापूर्वी गोयल यांनी एलफिन्स्टन रोड आणि करी रोड स्टेशनचा दौरा केला. इथं त्यांनी सेनेद्वारे तयार केल्या जाणाऱ्या फूट ओव्हर ब्रिजचं निरीक्षण केलं. त्यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केल्यानंतर तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली... परंतु, ते आपल्या गाडीतूनच हॉस्पीटलमध्ये पोहचले.