Viral Video  -  सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. ते व्हिडीओ पाहून आपल्या कामाचा थकवा करतात आणि आपल्या हसू आवरत नाही. सोशल मीडियावर असाच एक मुंबईतील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफ लाईन. मुंबईत कामावर जाण्यासाठी लोकल ट्रेन आपली साथ देते. मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे दुसरं घरच म्हणायला हवं. मुंबईकरांचे दिवसातले अनेक तास हे लोकलमध्ये जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकलमध्ये भाजी निवडताना, स्वेटर विणताना मुंबईकर तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं असेल. तर काही लोकांनी असं व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. लोकल ट्रेनमध्ये उभं राहायला पण जागा नसते. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळात लोकलमध्ये चढणेदेखील कठीण असतं. अशातच एका मुंबईकराने ट्रेनमध्ये जणू संसारच थाटला असल्याचा व्हिडीओ पाहिला मिळतो आहे.  


अरे निदान त्या ट्रेनला तर सोडा...



मुंबईकरांचं आयुष्य फार धावपळीचं असतं. त्यामुळे कामाचं नियोजन करणं कोणी मुंबईकरांकडून शिकावं असं म्हटलं जातं. पावसाळा सुरु आहे. छत्री, रेनकोट असून सुद्धा कपडे ओले होतात. त्यात आता उन्हाचा पत्ता नाही. मग अशात कपडे कसे सुकणार? काही लोकं यातून काही ना काही मार्ग काढतात. मात्र या मुंबईकराने काय केलं असेल हे पाहून तुम्ही पण हसून लोटपोट व्हाल. लोकल ट्रेनमध्ये अर्धी मुंबई समावून जाते, असं म्हणतात मग काय या मुंबईकराने काय केलं. चक्क लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकवायला टाकले. हो, बरोबर लोकल ट्रेनमध्येच, बघा हा व्हिडीओ.



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लेटफॉर्मच्या इंस्टाग्रामवरील dadarmumbaikar या आयडीवर शेयर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 75 हजारपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. तर 10 हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.