मुंबई : राज्यभरात रस्त्यावरचे खड्डे (Pothloes) म्हणजे मृत्यूचे सापळे बनलेत, हजारो लोकांचा हकनाक बळी गेलाय. बोरिवलीतल्या दुर्घटनेनं (Borivali Flyover Accident) सर्वत्र हळहळ व्यक्त होतीय. यंत्रणा आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय.  (people lost life due to road pothloes see full report)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह राज्यभरात रस्त्यांची अक्षरश: चाळण झालीय. रस्त्यावरील हे खड्डे आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठतायेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर धक्कादायक घटना घडलीय. नॅशनल पार्क ब्रिजजवळ खड्ड्यांमुळे दोन निष्पाप बाईकस्वारांचा मृत्यू झालाय. 


खड्ड्यांमुळे दुचाकी चालकानं ब्रेक मारला. पण पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू डंपरनं त्यांना धडक दिली आणि जागेवरच चिरडलं. या दुर्घटनेत दुचाकीवर बसलेल्या पुरुष आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं राज्यातील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.  या घटनेचे तीव्र पडसाद अधिवेशनातही उमटले.


रस्त्यांवर मृत्यूचे खड्डे


खड्ड्यांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल 8 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतलाय. जानेवारी ते जून या काळात राज्यात तब्बल 17 हजार 225 अपघात झाले.  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 7 महिन्यांत 62 जणांचा मृत्यू झालाय.  या महामार्गावर जानेवारी ते 31 जुलै 2022 या 7 महिन्यांच्या कालावधीत एकूण 177 अपघात झालेत. 


रस्त्यावरच्या खड्ड्यांचा मुद्दा वेळोवेळी चर्चेत येतो. त्यावर उपाययोजना करण्याची आश्वासनं दिली जातात. पण खड्डेमुक्त रस्त्यांच्या घोषणा नंतर हवेत विरतात. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणा आणखी किती बळींची वाट पाहणार, हाच सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.