मुंबई : देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मोठा भडका उडालाय. महागाईला आमंत्रण देण्यात आलेय. वाहतूक दरवाढ, भाजीपाल्याच्या दरात वाढ, एसटीची भाडेवाढ  करण्याचे संकेत मिळालेत. त्यामुळे महागाईचा उद्रेक होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेय. काही राजकीय पक्षांनी आंदोलन करत निषेध करत केलाय. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या व्यंगचित्र पोस्टरमधून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यालयासमोर पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत होर्डींग्स लावण्यात आली आहेत. ही होर्डिग्स मनसेनं लावली आहेत. त्यामुळे भाजप आता काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले. पेट्रोल डिझेल दरवाढीवर मार्मिक भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून केले होते. त्यांच्या या व्यंगचित्राचे पोस्टर भातखळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावून मनसेनेने इंधन दरवाढीचा निषेध  व्यक्त केला आहे.